आंतरराष्ट्रीय योग दिन राजभवन येथे सूर्योदयाच्या साक्षीने राजयोग




 मुंबई, दि. 21 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज राजभवनमुंबई येथे उगवत्या सूर्याच्या साक्षीने राजभवनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी योगासने केली तसेच राजयोग ध्यानधारणा केली.
 ब्रह्मकुमारी तसेच कैवल्यधाम या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डीउपसचिव रणजीत कुमारपरिवार प्रबंधक वसंत साळुंकेएडीसी स्क़्वाड्रन लीडर अजित ढोकणे आणि गौरव सिंग तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
ब्रम्हकुमारी या संस्थेच्या वतीने ब्रम्हकुमारी रुक्मिणीबेनब्रम्हकुमारी गीतादीदीबी के अनुशा तसेच बी. के. बापुलाल यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोग ध्यान तसेच योगासने करण्यात आली. त्यानंतर कैवल्यधाम या संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली. 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111