विमानतळाविरोधात शेतकरी रस्त्यावर
अंबरनाथ
कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा वाद पेटला असून या विमानतळासाठी संपादित केलेली जमीन परत मिळवण्यासाठी आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. इतकंच नव्हे तर पोलिसांना लक्ष्य करत त्यांच्या गाड्याही जाळल्या. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला. त्यात पाच ते सहा आंदोलक जखमी झाले आहेत.
नेवाळी विमानतळासाठी सरकारनं जबरदस्ती जमिनी संपादित केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. स्वातंत्र्याआधी संपादित केलेली ही जमीन स्थानिकांना परत मिळावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. याच मागणीसाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी नेवाळी नाका परिसरात जोरदार आंदोलन केलं. आंदोलकांनी टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला. आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतकरी संतप्त झाले.संतप्त आंदोलकांनी पोलिसांनाही लक्ष्य केलं. आंदोलकांनी उपनिरीक्षक सुनील जाधव बेदम मारहाण केली. तसंच, पोलिसांच्या गाड्यांना आगी लावल्या. आंदोलकांना रोखण्यासाठी भाल गावात पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला. त्यात पाच ते सहा आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही मारहाण झाल्याचं वृत्त आहे. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन धडक कृती दलाच्या (आरएसपी) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


