अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपाध्यक्ष इ. जी. भालेराव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी-गणेश अंकुशराव
पंढरपूर (प्रतिनिधी):- अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे चे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष इ. जी. भालेराव यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, ठाकूर, ठाकर मन्नेवारलू इत्यादी आदिवासी जमातींची बदनामी करुन त्या जमातींची मानहानी करीत बुध्दीपरस्पर व पुर्वग्रहदुषीत सुडबुध्दीने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचीत ठेवण्याचा घोर अपराध केला आहे. त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरील नियमबाह्य वर्तणुकीविषयी आमची तक्रार असून आमच्या तक्रारीची दखल तात्काळ घेवून या अधिकार्याची विभागीय चौकशी होऊन त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचेकडे केली आहे. यावेळी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक चंद्रभागेच्या वाळवंटात व्हावे अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले.
अनुसुचित जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे चे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष इ. जी. भालेराव यांनी वरील जमाती ह्या आदिवासी जमाती नामसदृश्यतेचा फायदा घेऊन जमाती म्हणून गैरफायदा घेत आहेत. अशा आशयाचे पत्र विभागीय आयुक्त (महसुल) पुणे विभाग, जिल्हाधिकारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर यांना पाठवले आहे. त्यांनी केलेले हे कृत्य म्हणजे बुध्दीपरस्परपणे त्यांनी असे पत्र पाठविण्याचा त्यांना कोणताही अधिकार नसताना चुकीची व संदिग्ध माहिती या पत्राद्वारे वरील प्रशासकीय अधिकार्यांना कळवून वरील सर्व जमातींची बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले आहे.
भालेराव यांनी स्वत: व महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने किंवा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी व त्यांच्या जात पडताळणी समित्यांनी ‘‘ढोर किंवा ढकिरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी, मल्हार कोळी, ठाकूर, ठाकर, मन्नेरवारलू’’ जमातच्यिा ‘‘रुढी परंपरा, गुणवैशिष्ट्ये, चालीरिती, आडनावे, देवदैवते, व्यवसाय, नृत्यप्रकार’’ इत्यादी संदर्भात तपशीलवार अधिकृत माहिती तसेच प्राचीन गुणविशेष, भिन्न संस्कृती भौगोलीक वेगळेपण, विभीन्न बोलीभाषा, प्राण्यांच्या शिकारीवर जगणे, व्यवसाय, नैसर्गिक बुजरेपणा, मागासलेपण या आदिवासी समाजाच्या जागतीक पातळीच्या गुणवैशिष्ट्यासंबंधी प्राधिकृत मानववंश शास्त्रज्ञांकडून अधिकृतपणे संशोधन केलेली माहिती द्यावी. अन्यथा आकसापोटी, बुध्दीपरस्परणे अधिकाराचा गैरवापर व मनमानी करीत सक्षम अधिकार्याची दिशाभुल करुन अनुसुचित जमातीच्या बांधवांना त्यांच्या सांविधानिक हक्कापासून व अधिकारापासून वंचीत ठेवल्याच्या व त्यांची हकनाक मानहानी व बदनामी केल्याच्या गुन्ह्याखाली तातडीने भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करवा व त्यांना निलंबीत करुन त्यांची तात्काळ विभागीय चौकशी सुरु करावी. अशी मागणी केली आहे.
भालेराव यांनी केवळ आदिवासी समाजावरच अन्याय केला नसून त्याचसोबत इतर अधिकार्यांच्या हक्कावरही गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरी भालेराव यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम 1979 व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी विनंती आदिवासी विकास मंत्र्यांकडे केल्याची माहिती गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


