जात पडताळणी समितीच्या आदेश असूनही प्रांताधिकार्‍यांचा जातीचे दाखले देण्यास नकार * अदिम विकास परिषदेचे ना.रामदास आठवलेंना निवेदन *

सोलापूर जिल्हयातील अदिवासी कोळी महादेव समाज बांधव गेल्या कित्येक वर्षापासुन अनुसुचित जमातीच्या दाखल्यासाठी संघर्ष करीत आहेत.पुणे विभागीय जात पडताळणी समितीने काही पडताळणी बाबतच्या प्रकरणात कोळी महादेव जमातीचे दाखले वैध असल्याचे प्रमाणित करुन प्रांताधिकारी पंढरपूर यांना अनुसुचित जमातीचे दाखले देण्याबाबतचे पत्र देवूनही येथील प्रांताधिकारी हे सदर दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत.या मुळे कोळी महादेव समाजातील बेरोजगार युवकांचे व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.तरी याबाबत त्वरीत योग्य ते आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांना देण्यात आले आहे.
               सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाजातील अनेक विद्यार्थी व युवकांनी पुणे विभागीग जात पडताळणी समितीसमोर पडताळणीसाठी योग्य ते पुरावे दाखल करुन व समक्ष सुणावणीस उपस्थित राहून जात पडताळणी प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.व या पडताळणी समितीने अनुसुचित जमातीचे दाखले देण्याबाबतचे पत्रही प्रांताधिकारी पंढरपूर यांच्या नावे दिलेले आहे.तरीही या प्रांताधिकारी कार्यालयाकडून अनेक वैध प्रकरणात अनुसुचित जमातीचे दाखले देण्यास टाळाटाळ केली जात.ही बाबत अतिशय गंभीर असून कोळी महादेव जमातीच्या युवकांचा भविष्यकाळ त्यामुळे अंधकारमय झाला आहे, नोकरीच्या संधी हिरावून घेतली जात आहे.या गंंभीर प्रकाराबाबत आपण केंेद्रिय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांची भेट घेवुन त्यांच्याकडे  सविस्तर निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे अशी माहीती अदिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव यांनी दिली आहे.
      हे निवेदन देताना सोमानथ कोळी,धिरज परचंडराव,चेतन नेहतराव,नरेश जवंजाळ,विजय सुरवसे,सुनिल हिरणवाळे,मिलींद परचंडराव,नितिन पानकर,संदीप परचंडराव,प्रज्वल परचंडराव यांच्यासह अदिम विकास परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111