हडपसरला पालखी सोहळ्यात सव्वापाच लाखांचे दागिने लंपास
संशयावरून एका पोलीस मित्राने तिघांना पाठलाग करून पकडले असून, त्यात एका तरुणीचाही समावेश आहे.
तरुणीसह तिघांना पकडले
हडपसर येथे पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलांसह पुरुषांकडील तब्बल सव्वापाच लाखांचे दागिने चोरटय़ांनी मंगळवारी लंपास केले. संशयावरून एका पोलीस मित्राने तिघांना पाठलाग करून पकडले असून, त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत आठ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
दुर्गा प्रमोद विटेकर (वय २२, रा. देगलूर, नांदेड), विनोद बाळासाहेब भिसे (वय २६) व राजेंद्र रामू माने (वय २७. दोघेही रा. पाथर्डी, जि. अहमदगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुक्कामानंतर मंगळवारी सकाळी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी हडपसर येथे आली. मोठय़ा प्रमाणावर भाविक पालखीच्या दर्शनाला आले होते. चोरटय़ांनी गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ महिला व पुरुषांना लक्ष केले. हडपसर ते मंतरवाडी या मार्गावर भेकराईनगर बस थांबा, भारत साडी सेंटर, मंतरवाडी फाटा, पवनी स्वीट्स, भेकराईनगर या परिसरामध्ये चोरटय़ांनी मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या पळवल्या.
भेकराईनगरमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवताना उबेद असल्म शेख (वय २६, रा. हडपसर) या पोलिस मित्राने काहींना पाहिले. त्याने तत्काळ चोरटय़ांचा पाठलाग केला.
इतर पोलिस मित्रांच्या मदतीने राजेंद्र माने याला पकडण्यात आले. इतरांनाही घटनास्थळी रंगेहात पकडण्यात आले. आतापर्यंत सोनसाखळीचे आठ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये सुमारे सव्वापाच लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यातील सहा गुन्हे पकडलेल्या तिघांकडून उघड झाले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111