वारी विशेष लेख- सजीव देहामध्ये नवचैतन्य निर्माण करणं हे परमार्थ
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 
ज्ञानेश्वर महाराजांनी जवळ जवळ अवतारसंपविलाच होता. परंतु मुक्ताईमुळे जगताचाउद्धार करण्यासाठी काही दिवस परतथांबले. ज्ञानेश्वर महाराजांना एकदामांडा खायची इच्छा झाली.(मांडा म्हणजे मोठ्या आकाराचीपुरणपोळी) जी खापरावर भाजतात.(खापरा म्हणजे मोठ्या आकाराचं मडकं)तेव्हा आपल्या मुक्ताईला त्यांनी मांडाकरायला सांगितले. म्हणून मुक्ताई कुंभारदादाकडे मडकं आणण्यासाठी गेल्या व मडकंघेऊन येत असताना रस्त्यात विसोबाचाटी याने मुक्ताईला पाहून सन्याशाचीपोरं आणि ह्यांना मांडा खायचं सुचतं? असेबोलून मडके फोडले व गालावर फटकामारला.मुक्ताई रडत-रडत घरी आली. ज्ञानेश्वरांनीविचारले का रडतेयस? विसोबा चाटीयाने मारलेय म्हणून रडतेस. मुक्ताईच्याअंत:करणात आई जागृत झाली. ती म्हणालीमारणं सहन केल असतं. पण मडकं फुटल्यावर मांडाकशावर भाजणार? तुम्हांला खायला कायदेणार? म्हणून रडते. हे ऐकल्यावर ज्ञानेश्वरमहाराजांच्या अंत:करणातील अग्नीप्रज्वलित झाला. शरीर लालबुंद झाले.मुक्ताईला सांगितले, जा मांडे तयार कर,पाहिजे तेवढे तयार कर आणि भाज माझ्यापाठीवर. काय आश्चर्य! पाठीवर भाजलेल्यामांड्याचा वास सर्वत्र दरवळत होता. हासर्व चमत्कार विसोबा चाटी खिडकीतूनपाहात होता. विसोबा चाटीहादरला.हे सामर्थ्य निराळंच आहे. आपलं काहीतरीचुकलं असं त्याला वाटू लागलं. ज्ञानेश्वरमहाराज ज्या पानावर जेवायला बसलेहोते त्या पानातली उरलेली शीतंविसोबा चाटी पुसून खात होता. हेपाहिल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनीत्यांना उठ खेचरा असे सांगितले. तेव्हापासूनविसोबा चाटीचा विसोबा खेचर झाले.ते ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेले.परमार्थातील विश्व निराळच आहे. श्रद्धेचंजगच निराळे आहे. निर्जिव वस्तुतून शोधलावणं हे शास्त्र. परंतू सजीव देहामध्ये नवचैतन्यनिर्माण करणं हे परमार्थ
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
पंढरीनाथाचं म्हणजे विठ्ठलाचं नाव (नाम) कसं आहे,याविषयी सांगताना संत तुकाराम म्हणतात ः "एखाद्यालावैराग्य प्राप्त होतं, तेव्हा एक गोष्ट घडते, ती म्हणजे, संसारम्हटलं की वैरागी घाबरतो. विषय म्हटला, की घाबरतो, पणविठूनामाचं तसं नाही...ते घेताना कोणतेही प्रयत्न करावे लागतनाहीत. तंत्र-मंत्र शिकावं लागत नाही. एवढंच काय, आंघोळकरणं किंवा तोंड धुण्याचीही गरज नाही.‘ आपण वर वरस्वच्छ होऊन शुचिर्भूत होण्याचा प्रयत्न करत असतो; पणसंत तुकाराम सांगतात "जिवांनी (माणसांनी) द्रव्याची इच्छाधरली तरी चालंल, संसाराला घाबरलं नाही तरी चालंल. कारण,एका विठूरायाचं नाव भवदुःख नाश करणारं आहे. वेदशास्त्रसमजून घेण्याची खटपटही नाही केली, तरी चालंल. कारण,सर्व काही विठ्ठलनामात भरून पावलं आहे.‘ किती सुंदर अभंगआहे,नव्हे गुरुदास्य संसारिया। वैराग्य तरी भेणें कांपे विषयां।तैसे नाम पंढरिया। जया सायास न लगती ।। 1।।म्हणोनि गोड सर्वभावें। अंघोळी न लगे तोंड धुवावे।अर्थचाड जीवें । न लागे भ्यावें संसारा ।। ध्रु.।।कर्मा तंव न पुरे संसारिक। धर्म तंव फलदायक।नाम विठ्ठलाचे एक । नाशी दुःख भवाचे ।। 2।।न लगे सांडणे मांडणे। आगमनिगमाचे देखणे ।अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामी आटलें
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
आषाढसरी बरसू लागल्या की दरवर्षी लाखो पावलं
पंढरीच्या ओढीनं चालू लागतात. हातात टाळ घेऊनमृदंगाच्या तालावर नाचत , गर्जत , विठ्ठलनामाचा जयघोषकरीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंड्या म्हणजेचैतन्याचा प्रवाह. या भक्तिसोहळ्याच्या निमित्ताने चित्तनिर्मळ करणारे हे ' कैवल्याचे चांदणे ' आषाढी एकादशीपर्यंतआजपासून दररोज...
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं।
विठाई जननी भेटे केव्हां।। १।।
नलगे त्याविण सुखाचा सोहळा।
लागे मजज्वाळा अग्निचिया।। २।।
तुका म्हणे त्याचें पाहिलिया पाय।
मग दुःख जाय सर्व माझें।।३।।
आपण सर्वच चकोर. भुकेले. तृषार्तही. संसाराच्या रखरखीतवाळवंटात प्रतिकूलतेचे दगडगोटे चघळण्याचे प्राक्तनभोगणारे आपण , फुटणाऱ्या हिरड्यांतूनस्रवणाऱ्या रक्तालाच त्या दगडांतून पाझरणारा रससमजतो अन् कणभर तृप्तीच्या क्षणभर आभासावरजीवनाचा भार तोलू पाहातो.चकोर पक्षी निखारे खातो म्हणतात.आपणही संसारातल्या विखारी निखाऱ्यांत होरपळतो. ' संसारदुःखमूळ चहुंकडे इंगळ. ' त्यांतपोळतानाही सुखासाठीची आपली आस एवढी चिवट ,की धगधगीत निखाऱ्यांनाच लाल-निळे माणिक-नील समजून तेकवटाळतो. दुःखाने दुःख वाढते , तशी सुखाची अभिप्साही.जन्मजन्मांतरीच्या अशा प्राणांतिक तळमळीने उरी फुटतअसता अपार करुणेने ओथंबलेले श्रीनामदेवरायांचे शब्दआपल्यावर साऊल धरतात ,' सुखालागी जरी करिसी तळमळ। तरी तूं पंढरीसी जायएकवेळ।। १।।मग तूं अवघाचिं सुखरूप होसी। जन्मोजन्मीचें दुःख विसरसी।।२।।श्रीनिवृत्तीनाथांचाही आश्वासक दुजोरा मिळतो , आपणदुःखाने होरपळणारे चकोर असलो , तरी ' तो ' चंद्रमा आहे. 'आम्ही चकोर हरि चंद्रमा. ' माऊलीही सांगतात -तापत्रयाग्नीच्या वणव्यापासून वाचायचे असेल तर , 'पंढरीवांचूनि दुजा ठांव नाहीं कोठें। ' पंढरीत औषधालाही दुःखनाही. तिथे औषधाचीच गरज नाही , कारण कुठली आधी-व्याधीच नाही. भवरोगच समूळ नष्ट होतो ; तिथे ' आणिककाय क्षुल्लकें ?' पंढरीत सुखाच्या पेठांत सुखाची दुकानेंआहेत. त्यांत सुखाचा माल फुकटच मिळतोय.मोकळ्या चित्ताने या. आपापल्या पात्रतेची मापें आणा.भरभरून सुख लुटा. कुणी अडवणार नाही.
' माप आपुलेंनि हातें।
कोणी नाहीं निवारितें।
पैस करूनि चित्तें।
घ्यावें हितें आपुलिया।।
'कुणीही कितीही लुटली तरी , '
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं।जुनाट हें खाणी '
उघडली आहे. या.संतमांदियाळीचे हे आर्जव ऐकून ' आतां जावें पंढरीसी ' असेआर्त प्राणा-मनांत दाटते. ' अवघी सुखाचीच राशी 'असणारा तो सुखरूप पांडुरंग अन् सर्व दुःखांवरचा उपायअसणारे त्याचे पाय केव्हा एकदा पाहातो , असे होते.संतांमुळेच खऱ्या सुखाचे स्वरूप कळाले अन् स्थानही.त्याच्या प्राप्तीची शक्यता आवाक्यात येताचआणि आतापर्यंत ज्यास ' सुखाचें सोहळें ' समजत होतो , तेखरेतर दुःखाचेच सापळे होते , हेही ध्यानी येताचव्याकुळता वाढते अन् आभासी सुखाचे भ्रामक सोहळेअधिकच पोळतात.नेमक्या अशावेळी इकडे कैवल्याच्या चांदण्याचा पाऊसअविरत बरसतो आहे. दशदिशांतून दिंड्यांच्या रूपानेत्या चांदण्याचा पूर पंढरीच्या दिशेने वाहतो आहे. तो पूरउरी सामावून घेणारा ; सर्व सुखाचे आगर-सागर असणारा ;सर्वांचा बाप रखुमादेवीवरही हेलावतो-बोलावतो आहे.या उचंबळणाऱ्या सुखसोहळ्यातले चार-दोन तुषार जरी लाभले, तरी जीवन कृतार्थतेने-साफल्याने उजळेल.
चला पंढरीसी जाऊं। रखुमादेवीवरा पाहूं।। १।।
डोळें निवतील कान। मना तेथें समाधान।। २।।
शिवाय , त्रिविधतापांनी संतप्तझालेल्या त्रिभुवनाला निवविण्यासाठी त्या सकळकळावंतचंद्रासही आपल्या मिषाने चकोराचे निमित्त मिळेल.म्हणूनही पंढरीसी जावें.
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
#विठोबाची_खुण_जाणती_संत
●■●■●■●■●■●■●■●■●
आजकाल बहुतेक ठिकाणी एक संत वचन नेहमीच आपणा सर्वांना ऐकण्यात येते
#नको_ब्रह्मज्ञान_नको_ब्रम्हज्ञानजिकङे पहावे तिकङे सर्वच म्हणताय#नको_ब्रम्हज्ञानपरंतु हे नेमक काय आहेवहे ब्रम्हज्ञान नेमक भेटते तरी कुठे ???याचा पत्ता तुकोबाराय या अंभगात देतात#गुरूचिया_मुखे_होईल_ब्रम्हज्ञान !#न_कळे_प्रेमखुण_विठोबाची !!महाराज म्हणतातसदगुरूच्या मुखातूनच श्रवण केल्यावरच ब्रम्हज्ञान होणे शक्य आहेकारणत्यावाचून प्रभूच्या अनाकलनीय स्वरूपाची प्रेमखुण कळणार तशी कशी ???तुम्ही वेद शास्र पुराण याचा कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला प्रभुच्या प्रेमभावाची कल्पना येणारच नाहीहि तर नसता उठाठेव आहे#वेदासी_विचारा_पुराणाते_पुसा !#विठोबाचा_कैसा_प्रेमभाव !!महाराज तर म्हणतातपुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाहीफक्त#वेद_अंनत_बोलीला !#अर्थ_इतकाची_निघाला !!तसेचशास्राचे तर भांडण अजुनही मिटलेलेच नाहीह्यापेक्षा#तुका_म्हणे_सान्ङा_जाणीवेचा_शिण !#विठोबाची_खुण_जाणती_संत !!महाराज म्हणतातपरमेश्वर प्राप्तीसाठी अनाठायी श्रम घेउच नका ना ??त्यापेक्षा#का_रे_हिङंता_रानोरानी !#पुसा_संतासी_जाऊनी !!प्रभुची वास्तव प्रेमखुण फक्त संतच जाणतातत्यानाच शरण जाऊना ??.....#चला_तर_मग..!वारीत सहभागी होवुनसंतानाच शरण जाऊया#जयमुक्ताई_रामकृष्णहरी
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
संकलन फेसबुक
श्री समाधान वाघ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

