मुस्लीम म्हणून अफजल खानाला मारलं नाही - शरद पवार
मुंबई, दि. 21 - छत्रपती शिवाजी महाराज सगळया धर्मांचे होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारलं नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तो स्वराज्याचा शत्रू म्हणून. मुस्लीम म्हणून त्याला संपवले नाही असे पवार म्हणाले. शरद पवार पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
शिवाजी महाराजांचा नौदल प्रमुख मुस्लीम होता असे त्यांनी सांगितले. इतिहास संशोधक शेजवलकरांच्या लिखाणाचा दाखला देऊन पवारांनी शिवाजी महाराज गोब्राम्हणप्रतिपालक नव्हते असेही विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांना त्यांचा विरोध होता.
शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी असते तर, त्यांनी अफजल खानाचा वकिल कृष्णाजी कुलकर्णीला सोडले असते. पण त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीचाही वध केला. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांचा विरोध मोडून काढताना त्यांनी हिंदू, नाती-गोती याची पर्वा केली नाही असे पवार म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


