लोणावळा नगरपरिषदेचे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित
लोणावळा नगरपरिषदेचे
श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे
हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या हस्तांतरणामुळे
नागरिकांना उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावर होणाऱ्या अपघातातील
रुग्णांना शासनाच्या आरोग्य सेवेचे लाभ मिळतील. राष्ट्रीय व राज्य आरोग्यविषयक
कार्यक्रमांची सक्षमपणे अंमलबजावणी करणेही शक्य होणार आहे.
श्रीमान बाबासाहेब डहाणुकर हे 50 खाटांची सोय
असलेले रुग्णालय लोणावळा नगरपरिषदेने 1969 मध्ये सुरु केले
असून या रुगणालयामार्फत लोणावळा शहर तसेच परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा
पुरवल्या जातात. लोणावळा व परिसरातील नागरिकांची सोय तसेच मुंबई-पुणे द्रुतगती
मार्गावर होणाऱ्या अपघातातील नागरिकांना जलद उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी
मध्यवर्ती ठिकाणी शासकीय रुग्णालयाची आवश्यकता होती. त्यामुळे हे रुग्णालय
सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या
निर्णयानुसार पुढील सहा महिन्यात रुग्णालयाचे मालकी हक्क, संबंधित
भूखंड, इमारती व यंत्रसामग्रीसह सार्वजनिक आरोग्य विभागाकडे
हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


