नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने महाराष्ट्रातील सर्व शासकीय व नगरपरिषद कर्मचारी दि.१२,१३,१४ जुलै २०१७ रोजी संपावर जाणार.
Pandharpur Live
सोलापूर जिल्हा नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्याविविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनीलवाळुजकर, जिल्हाध्यक्ष कॉ.सिद्धाप्पा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.
राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी यांना सातवा वेतनआयोग लागु करावा, नगरपरिषदांना सहा.वेतन अनुदान वेळेवर न दिल्याने नगरपरिषद कर्मचा यांचेतीन तीन महिने वेतन होत नाही. त्यामुळे सहा.वेतन अनुदान प्रत्येक महिन्याच्या १ तारखेसऑनलाईन त्या त्या नगरपरिषदेच्या खात्यावर जमा करावे. वारसा व अनुकंपाची पदे त्वरीतभरावेत. नगरपरिषदेमधील संवर्ग व इतर रिक्त पदे त्वरीत भरावीत.तसेच संवर्ग कर्मचा-यांच्या बदल्याबाबत नव्याने काढलेला अन्यायकारक आदेश त्वरीत रद्द करावा व पुर्वीप्रमाणेच राज्य (अ), विभागीय (ब), जिल्हा (क) संवर्गाप्रमाणे बदल्याचे धोरण ठेवावे. तसेच नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषद,नगरपंचायती मधील कर्मचा-यांचे त्वरीत समावेशन करुन नगरपरिषद कर्मचा-यांप्रमाणे सर्व लाभया कर्मचा-यांना लागु करावेत तसेच या नगरपरिषदेमधील रोजंदारी व कंत्राटी कर्मचा-यांना कायमकरावेत व इतर मागण्यांसाठी दि.११-०५-२०१७ रोजी महाराष्ट्र नगरपरिषद समन्वय समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यापासुन ते मुख्याधिकारी पर्यंत सर्वांना निवेदन दिले होते. परंतु शासनानेनगरपरिषद कर्मचा-यांच्या मागण्याकडे लक्ष न दिल्याने आज संपुर्ण महाराष्ट्रातील ३३० नगरपरिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदादि.१२, १३, १४ जुलै २०१७ रोजी ३ दिवस लाक्षणीक संपावर जाणार असल्याचे राज्याचेजनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर यांनी सांगितले. यावेळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे, किशोर खिलारे, धनजी वाघमारे, संतोष सर्वगोड यांनी प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी यांना निवेदन दिले.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदेमधील कामगार संघटनेचे पदाधिकारी, राम पवार,हरि देवकर-मंगळवेढा, धनराज कांबळे-अक्कलकोट, अमर शिंदे-अक्कलकोट, अरुण मांडवे, दिलीप जाधव-मोहोळ, बाळासाहेब पायगण, अशोक पलंगे-कुर्डुवाडी, निलेश कस्तुरे-माळशिरस, स्वामी वकुरडे-माढा,संजय दौंडे, महालिंग पाटणे-सांगोला, महादेव कांबळे, प्रदिप शिंदे-करमाळा, नागेश लांबतुरे, बापु कसबे, किरगल-मैंदर्गी, पाखरे-दुधनी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



