देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा - केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू

केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. मेघवाल म्हणाले की, 2017 हे वित्तीय सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. देशातील व्यवहार डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आले आहे. देशामध्ये 91 लाख नवीन करदात्यांची यामुळे भर पडली आहे.
श्री. बापट म्हणाले की, नगरविकासाच्या क्षेत्रात पुणे महापालिकेने नवीन विक्रम केला आहे. बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीमती भट्टाचार्य, ‘सेबी’चे अध्यक्ष श्री. त्यागी, मुंबई शेअर बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविक केले.
या बॉण्डच्या माध्यमातून 2264 कोटी रुपये पुणे महापालिका उभारणार असून या द्वारे उभारलेल्या निधीतून 24x7 पिण्याचा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पुढील 30 वर्ष पुणेकरांना शुद्ध, स्वच्छ पाणी यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी प्रकल्प, जलवाहिन्या आदी कामे केली जाणार आहे.
या सोहळ्यास पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनीधी, वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111