कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा उत्साह

करवीरनगरी अर्थात कोल्हापूरमध्ये आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या राजर्षींना आज अभिवादन करण्यात आलं.







 26 जून : करवीरनगरी अर्थात कोल्हापूरमध्ये आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या राजर्षींना आज अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूरमधल्या कसबा बावड्यातल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये म्हणजेच शाहू जन्म स्थळावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक नेत्यांनी शाहू राजांना अभिवादन केलं.
सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापूरच्या महापौर हसनी फरास, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख यांच्यासह शाहू प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि आजच्या जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111