पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचा 70 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न.
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचा 70 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा समारंभ मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, मा.उपनगराध्यक्ष राहुल साबळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते सचिन डांगे, बांधकाम समिती सभापती सौ.सविता सत्यविजय मोहोळकर, शिक्षण समिती सभापती सौ.रेहाना इब्राहीम बोहरी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.श्रीदेवी सुधाकर बंदपट्टे, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक लक्ष्मण पापरकर (शिरसट), शैलेश बडवे, शिवाजी कोळी, महेश साठे, इक्बाल बागवान, प्रकाश परदेशी, नामदेव भुईटे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, समाजसेवक विवेक बेणारे, सत्यविजय मोहोळकर, शंकर पवार, मुकेश कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ संपन्न झाला.
यावेळी मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष राहुल साबळे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणुन जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले.