ट्विटर ढेपाळलं, #TwitterDown वर्ल्डवाईड टॉप ट्रेंड
मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटर आज गेल्या काही तासापासून डाउन आहे. त्यामुळे ट्विटरचे अनेक फीचर काम करीत नसल्याचं दिसून येत आहे. वेबसाइटसोबतच ट्विटरचं मोबाइल अॅपही क्रॅश झालं आहे. त्यामुळे ट्विटरवर #TwitterDown हा हॅशटॅग टॉप ट्रेडिंगमध्ये दिसून येत आहे.ट्विटरवर खालील मेसेज दाखविला जात आहे.वेबसाइटवर व्हिजिट केल्यानंतर यूजर्सला एक मेसेज दाखविण्यात येत आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, “काही तांत्रिक बिघाड झाला आहे. नोटीस करण्यासाठी धन्यवाद. आम्ही ही समस्या सोडवू आणि लवकरच पूर्वीप्रमाणे ट्विटर काम करु लागेल.
(‘Something is technically wrong. Thanks for noticing—we’re going to fix it up and have things back to normal soon.’)
काय आहे संपूर्ण प्रकरण:
– ट्विटरची वेबसाईट आणि अॅप दोन तासासाठी ठप्प होती.
– याच दरम्यान, ट्विटरची अधिकृत क्लाइंट Tweetdeck देखील बंद होती.
– एका रिपोर्टनुसार, ही समस्या सर्वात आधी यूकेमध्ये आढळून आली.
– जगभरात ट्विटरचे 30 कोटी अॅक्टिव्ह यूजर्स आहेत.
सोमवारी संध्याकाळी देखील ही ट्विटर डाउन झालं होतं.
– सोमवारी संध्याकाळी 6.23 ते 6.33च्या दरम्यान, सर्व यूजर्सना ट्विटर अॅक्सेस करता येत नव्हतं.
– ही समस्या वेब आणि अॅप या दोन्हीवर येत आहे.
– त्यानंतर ट्विटरकडून यूजर्सची माफीही मागण्यात आली.
– मागील काही महिन्यापासून ही समस्या वारंवार येत असल्याचं आढळून आलं आहे.
– 15 जानेवारीला देखील अशीच एक समस्या समोर आली होती.