'विठ्ठल'साठी भालके-रोंगे चुरशीचा सामना तेरावा महिना

गुरसाळे : पंढरपूर तालुक्यातील २६ हजारांहून अधिक सभासद असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा ग्रामीण भागातील १0४ गावात उडत आहे. आ. भारत भालके विरूद्ध डॉ. बी. पी. रोंगे असा सामना रंगला आहे. २१ जागांसाठी ही चुरशीची निवडणूक होत असल्याने श्री विठ्ठल परिवारातील अनेक नेते व कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागले आहेत.
श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूक डॉ. रोंगे यांनी प्रतिष्ठेची केली असल्याने विठ्ठल परिवारातील आ. भारत भालके, कल्याणराव काळे, राजूबापू पाटील, युवराज पाटील आपल्या ताकदीनिशी प्रचाराला लागले आहेत. विठ्ठलची निवडणूक ही आजवर तालुक्यात व जिल्ह्यात खळबळ उडविणारी होत होती. कारखान्याच्या संचालक पदासाठी अर्ज भरून किमान आठ दिवस (अर्ज मागे घेईपर्यंत) आपण संचालक असल्याच्या जोशात अर्ज भरणारे वावरत होते; मात्र आ. भारत भालके यांनी तालुक्यात प्रचार दौरे करून सर्वांना आपलेसे केले; मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची सध्या गावात पंचाईत झाली आहे.
तालुक्यातील अधिक सभासद असलेल्या करकंब, भाळवणी, रोपळे, सुस्ते, उंबरे-पागे, बाभुळगाव, तुंगत, गादेगाव, पिराची कुरोली, भंडीशेगाव या गावातील आ. भालके सर्मथकांना उमेदवारी मिळाली नाही. एकेकाळी दोन-दोन संचालक असणार्‍या या गावात सध्याच्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नसल्याने नाराजीत भर पडल्याची चर्चा सभासदांमधून होत आहे.  तेरावा महिना र८ेु'>च्/र८ेु'>दुष्काळामुळे सभासदांच्या शेतात उसाचे पाचट राहिलेले नाही. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा असे प्रश्न आहेत. काही शेतकरी ऊस कारखान्याला घालविण्याचा प्रयत्न करीत असताना ही निवडणूक लागल्याने हताश होत दुष्काळात तेरावा महिना सुरू झाल्याची चर्चा होत आहे.