नागपुरात 'गो एअर' विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
नागपूर : विमानात बॉम्ब असल्याच्या शंकेमुळे भुवनेश्वरहून मुंबईला जाणाऱ्या G8 243 या सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी निघालेल्या विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. ‘गो एअर’ कंपनीचं विमान एअर ट्राफिक कंट्रोलच्या सूचनेनंतर 9 वाजून 29 मिनिटांनी नागपूरला उतरवण्यात आलं.
इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानातील 150 प्रवाशांना बाहेर उतरवण्यात आलं. सीआयएसएफ, स्थानिक पोलीस
आणि बॉम्ब शोधक पथकानं विमानात कसून तपासणी केली. मात्र बॉम्ब किंवा इतर कुठलीही संशयास्पद
वस्तू विमानात आढळून आली नाही.
आणि बॉम्ब शोधक पथकानं विमानात कसून तपासणी केली. मात्र बॉम्ब किंवा इतर कुठलीही संशयास्पद
वस्तू विमानात आढळून आली नाही.
विमानात सापडलेल्या एका बेवारस बॅगेमुळे हा सगळा खटाटोप करण्यात आला. मात्र त्यात कुठलीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी हे विमान पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आलं. स्थानिक पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.