पंढरपूरच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी साहित्य संमेलनात उंचावली पंढरपूरची मान
पंढरपूर (प्रतिनिधी):- पुणे येथे 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंढरपूरच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी ‘काव्यकट्टा’ च्या मंचावर ‘देव नाही आमचा विचारच बाटला’ ही कविता सादर केली. तेंव्हा उपस्थित साहित्य रसिकांसह साहित्यिकांनी टाळ्या वाजवित भरभरुन दाद दिली.
यावेळी सौ.पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्ष श्री.सबनीस यांना आपला कविता संग्रह भेट दिला. तसेच अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना विठ्ठल-रुक्मिणी ची प्रतिमा भेट देऊन त्यांचा पंढरपूरकरांच्या वतीने सत्कार केला. तसेच कवी फ.मु. शिंदे यांनाही विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
विशेष म्हणजे पंढरपूच्या अभिमानात आणखी एक भर पडली ती म्हणजे ‘काव्यकट्ट्यावर’ पाहुणे म्हणून बसण्याचा मान मिळाला. यावेळी सौ. पाटील यांनी ‘माझे माहेर पंढरी’ ही कविता सादर केली. यावेळी उपस्थित रसिक प्रेक्षक भारावुन गेले. पंढरपूरचे नांव साहित्य संमेलनामध्ये घुमले. रत्नप्रभा पाटील म्हणजे पंढरपूर असे जणु समीकरणच झाले. यावेळी रत्नप्रभा पाटील यांनी एकाच वाक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ती म्हणजे ‘‘मला पंढरपूरकर असल्याचा अभिमान वाटतो.’’