पंढरपूरमध्ये आज रात्री युवकाची हत्या... पुर्ववैमन्यातून खून झाल्याची पंढरीत चर्चा...
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि.6 जानेवारी 2015
आज रात्री पंढरीतील भादुले चौकानजीकच्या भगवंत कृषी केंद्रासमोर एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पुर्ववैमन्यष्यातून ही हत्या झाल्याची चर्चा ऐकावयास मिळते.
याबाबत पंढरपूर लाईव्ह च्या अधिकृत सुत्रांकडून व पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर वृत्त असे की, पंढरपूरमधील वरील ठिकाणी येथील सोमा टाकणे हा युवक आपल्या पत्नी व लहान बाळासह मोटारसायकल वरुन जात असताना कांहीजणांनी त्याला येथे अडवले व त्याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकली. यानंतर त्याच्या पत्नीला बालकासह येथून जाण्यास सांगितले. पत्नी गेल्यानंतर सोमा टाकणे याच्यावर यातील कांहीजणांनी वार केले. या घटनेत सोमा टाकणे याच्या डोक्याच्या निम्म्या भागावर वार झाले. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेत सोमा टाकणे यांचा जागीच मृत्यु झाला.
ही घटना पुर्ववैमन्यातुन झाल्याची चर्चा चालू असून या घटनेचे वृत्त वार्यासारखे पंढरीत पसरले. पंढरपूरमधील सर्व दुकाने पटापट बंद झाली... नेहमी किमान रात्री 10 वाजेपर्यंत गजबजलेल्या पंढरपूरात आज या घटनेमुळे 9 वाजताच स्मशान शांतता झालेली अनुभवयास मिळाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मात्र झालेली होती.
या घटनेबाबत पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.किशोर नावंदे यांची समक्ष भेट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की ही घटना गंभीर आहे. यातील मयताच्या पत्नीचा जवाब पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधवसाहेब स्वत: घेत आहेत. त्यांची तक्रार दाखल झाल्यानंतर लवकरच यातील फिर्यादी सांगतील त्या संशयीत आरोपींना जेरबंद करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिस प्रयत्नशील राहतील. पंढरपूर शहर हे अध्यात्मीक नगर आहे येथे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. या घटनेची गांभिर्याने दखल घेवून लवकरच याचा छडा लावु असेही श्री.नावंदे यांनी सांगितले.
ही बातमी प्रसिध्द करेपर्यंत पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे याबाबत नोंद करणेचे काम उशीरपर्यंत चालु होते.