दारुचा वास आल्यास गाडी बंद पडणार, तरुणींनी बनवलं अनोखं किट

लातूर: दारु सेवन करुन गाडी चालवणं म्हणजे जवळजवळ मृत्यूलाच आमंत्रण. मद्य प्राशनामुळे आजवर अनेक अपघात झाल्याचे आपण ऐकतो. यालाच आळा बसावा म्हणून एक अनोखं कीट तयार करण्यात आलं आहे. अल्कोहोलचा थोडाजरी वास गाडीत झाला तर या कीटमुळे गाडी सुरुच होणार नाही.

दारु पिऊन गाडी चालवता येणार तर नाहीच. शिवाय दारु प्यायलेल्या माणसासोबत गाडीतून प्रवासही करता येऊ शकणार नाही. अशी व्यवस्था लातूरच्या तरुणींनी करुन ठेवली आहे. लातूरच्या कॉक्सिट महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणींनी तयार केलेल्याया अनोख्या कीटची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली.

दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या 60 टक्के आहे. मात्र हे हटके किट गाडीत बसवल्यास अपघातांच प्रमाण कमी होईल, असा विश्वास या मुलींच्या प्राध्यपकांनी व्यक्त केला आहे.

हे अनोखं कीट बसवल्यानंतर दारू पिऊन गाडीत बसायची हिम्मत कोणी केली, तरंच नवलं.