दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

मुंबई : पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, या शब्दांत रावसाहेब दानवे यांनी आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी फेरनिवड होताच मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले.
प्रदेशाध्यक्षपदी दानवे यांचीच फेरनिवड होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात दिले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी केवळ दानवे यांचाच अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
त्या वेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दानवे, केंद्रीय निरीक्षक मुख्यमंत्र्यांकडून दानवेंची प्रशंसा
सरकार आणि भाजपा संघटनेत दानवे यांनी चांगला समन्वय त्यांनी राखला आहे. शासकीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून पक्षाचे कार्यकर्ते झटत आहेत. दुष्काळग्रस्त भागात पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळाल्याचे फडणवीस म्हणाले.
खा.पुरुषोत्तम रुपाला, निवडणूक संयोजक सुजितसिंह ठाकूर , महसूल मंत्री एकनाथ खडसे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी उपस्थित होते. 
निवडीनंतर पत्रकारांनी त्यांना मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करणार का, असे विचारले असता दानवे म्हणाले, अजून काहीही ठरलेले नाही. निवडणुकीची रणनीती इतकी आधी ठरत नसते. ती वेळेवर ठरवायची असते. राजकीय चाली या वेळेवर चालायच्या असतात. 
पण मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असे वक्तव्य करून आपण शिवसेनेला डिवचत नाही का या प्रश्नात दानवे म्हणाले की, अहो! त्याची आम्हाला एकमेकांना सवय झाली आहे. आमच्यात समन्वयदेखील चांगला आहे. उद्धव ठाकरे आम्हाला मार्गदर्शन करत असतात.