विठ्ठल साखर कारखाना निवडणुकीच्या मैदानात आमदार भारत भालकेंच्या शिलेदारांनी मारली बाजी.... कारखान्याच्या निवडणुक आखाड्यात प्रथमच उडी घेतलेले प्रा.बी.पी. रोंगेही चर्चेत... गटनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 20 जानेवारी 2016
गुरसाळे, ता. पंढरपूर येथील श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार भारत भालके यांच्या शिलेदारांनी बाजी मारत भालके गटाचे कारखान्यावरचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात प्रथमच शड्ड ठोकुन उतरलेले प्रा. बी.पी. रोंगेंच्या पॅनलला मिळालेली मते ही लक्षणीय असल्याची चर्चा राजकीय विश्लेष्कांमधुन होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने प्रा.डॉ. बी.पी. रोंगे ही चांगलेच चर्चेत आलेले आहेत.
या निवडणुकीत गटनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
भाळवणी गटातून
बागल कल्याण कृष्णा 5791 मते , बागल सुर्यकांत सदाशिव 17513 मते, काळे समाधान वसंतराव 17308 मते, पाटील दशरथ रघुनाथ 5678 मते मिळाली आहेत. या गटातून एकुण मतदान 46669 एवढे झाले असून 379 मते बाद झाली आहेत.
करकंब गटातून
खळगे दशरथ पंढरीनाथ 17406मते, नाईकनवरे पांडुरंग श्रीकांत 5795 मते, नाईकनवरे उत्तम रामचंद्र 17312 मते, वाघ रामचंद्र नारायण 5606 मते मिळाली आहेत. या गटातून एकुण मतदान 46484 एवढे झाले असून 365 मते बाद झाली आहेत.
मेंढापूर गटातून
भोसले दिपक दत्तात्रय 5712 मते, देशमुख पांडुरंग बाळासाो 5581 मते, होळकर सुभाष गंगाराम 5597 मते, पाटील पांडुरंग यशवंत 17574 मते, पाटील युवराज विलासराव 17584 मते, पवार लक्ष्मण नामदेव 17124 मते मिळाली आहेत. या गटातून एकुण 69525 एवढे झाले असून 353 मते बाद झाली आहेत.
तुंगत गटातून
कोळेकर मोहन बाबासाो 17207 मते, कोळेकर विक्रम वामन 747 मते, मेटकरी नारायण दादा 5869 मते, पाटील दिनकर दत्तात्रय 17258 मते, पवार बाळासाहेब नरहरी 5699 मते, सावंत नेताजी चंद्रकांत 17068 मते मिळाली आहेत. या गटातून एकुण 64221 एवढे मतदान झाले असून 373 मते बाद झाली आहेत.
सरकोली गटातून
भालके भगीरथ भारत 17149 मते, भालके भारत तुकाराम 17295 मते, भोसले निवास कृष्णा 149 मते, भोसले पंजाबराव कल्याणराव 5450 मते, भोसले विशाल वसंतराव 61 मते, गायकावड संतोषकुमार ज्ञानेश्वर 16865 मते, मोरे रमेश औदुंबर 5286 मते, सावंत राजाराम धोंडीबा 5385 मते मिळाली आहेत. या गटातून एकुण 68461 एवढे मतदान झाले असून 821 मते बाद झाली आहेत.
कासेगाव गटातून
भोसले भारत श्रीरंग 5926 मते, देशमुख विजयसिंह बाळासाहेब 17560 मते, जाधव गोकुळ दिगंबर 17497 मते, यादव भारत एकनाथ 5574 मते मिळाली आहेत. या गटातून एकुण 46904 एवढे मतदान झाले असून 343 मते बाद झाली आहेत.
महिला प्रतिनिधी मतदार संघ
भिंगारे मंदाकिनी राजाराम 17158 मते, भोसले राजश्री पंडीत 5803 मते, देठे कल्पना महादेव 16838 मते, रोंगे प्रेमलता बब्रुवाहन 5854 मते मिळाली आहेत. या मतदार संघातून एकुण 46042 एवढे मतदान झाले असून 389 मते बाद झाली आहेत.
अनुसुचित जाती-जमाती मतदार संघ
घोडके शहाजी नारायण 5601 मते, क्षिरसागर सतिश बाबुराव 201 मते, लोंढे बाळु कृष्णा 17237 मते मिळाली आहेत. या मतदार संघातून एकुण 23994 एवढे मतदान झाले असून 955 मते बाद झाली आहेत.
इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदार संघ
जाधव नारायण महादेव 17819 मते, शिंदे कुमार ज्ञानोबा 5842 मते मिळाली आहेत. या मतदार संघातून एकुण 23994 एवढे मतदान झाले असून 333 मते बाद झाली आहेत.
विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदार संघ
गडदे बाळासाो कृष्णा 17655 मते, पाटील विठ्ठल आबा 5982 मते मिळाली आहेत. या मतदार संघातून एकुण 23994 एवढे मतदान झाले असून 357 मते बाद झाली आहेत.