अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा व्यावसायिक गटातील संघ

व्यावसायिक गटात ज्योती, स्वाती पुरंदावडेकर, पुरंदावडे, तुमच्यासाठी कायपन, योगेश देशमुख पुणे, नखरेल नारी, सारिका नगरकर, कीर्ती देशमुख पुणे, शिवाणीचा नादखुळा, एकनाथ भोटे, पुणे, लावण्यखणी नागेश साळुंखे सोलापूर, लावण्यमोती देवयानी चंदगडकर मुंबई, लावण्यस्मृती माधुरी बडदे मुंबई या पाटर्य़ांनी सहभाग घेतला असल्याची माहिती सचिव सुभाष दळवी यांनी दिली. अकलूज : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा दि. २९, ३0 व ३१ जानेवारी रोजी शंकरनगर-अकलूज येथे होणार आहेत. स्पर्धेचे उद््घाटन स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे शुक्रवार, दि. २९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी पारंपरिक गटातून २0, व्यावसायिक गटातून सात अशा २७ पाटर्य़ांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
पारंपरिक गटात साई-पूजा लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी येडशी, राजलक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी बाश्री, घुंगरू लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी बाळे, वैशाली वाफ ळेकर नटरंग लोकनाट्य कला केंद्र मोडनिंब, मोहिनी सोलापूरकर, राधिका लोकनाट्य कलाकेंद्र मोडनिंब, लक्ष्मी लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी मोहा, अलका जामखेडकर लोकनाट्य कला केंद्र जामखेड, नूतन लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी इस्लामपूर, रेणुका लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी अंबप वाठार, लंका, नयना, प्रतीक्षा अकोलेकर पिंजरा लोकनाट्य कला केंद्र वेळे, गीता, पूनम, खुशबू वाईकर पिंजरा लोकनाट्य कला केंद्र वेळे, सुवर्णा, रेखा ओतुरकर पिंजरा लोकनाट्य कला केंद्र, वेळे, ऊर्मिला नगरकर, पिंजरा लोकनाट्य कला केंद्र वेळे, न्यू अंबिका लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी चौफुला, कल्पना रोहिणी सांगवीकर, पूजा लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी चौफु ला, कल्पना रोहिणी सांगवीकर पूजा लोकनाट्य कला केंद्र सणसवाडी, वैशाली समसापूरकर जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र सणसवाडी, सरगम लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी किन्ही वाठार, आर्य भूषण लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी पुणे, पूजा लोकनाट्य कला केंद्र ग्रुप पार्टी सणसवाडी, सागर ऊर्फ नटरंग लोकनाट्य कला केंद्र ज्येष्ठ कलावंत ग्रुप पार्टी मोडनिंब.