मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल आस्था, पण - शरद पवार
मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल आस्था आहे पण पुढच्या पिढीला मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा त्याचा आग्रह सुध्दा आहे. आपण आपल्या मुलांना भले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातलं तरी, तिथे मातृभाषा मराठी शिकवली जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. इंग्रजीच्या बरोबरीने मातृभाषा शिकण्याची संधी असलेल्या शैक्षणिक संस्थेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, अन्यथा मातृभाषेवर विपरित परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८९ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात बोलताना व्यक्त केले.
नवीन पिढी मातृभाषेचा कितपत स्वीकार करणार ते अत्यंत महत्वाच आहे. नव्या पिढीला मातृभाषेची गोडी लागावी यासाठी आपल्याला घरापासून धोरणात्मक निर्णय घेणा-यांपर्यंत खबरदारी घेतली पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
८९ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या तिस-या दिवशी आज शरद पवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार, कवी फ.मु.शिंदे आणि प्रा.जनार्दन वाघमारे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. त्यावेळी मराठी भाषेच्या भवितव्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी आपली ही भूमिका मांडली. शरद पवारांनी या मुलाखतीत मराठी भाषेबरोबरच, राजकारण, स्वतंत्र विदर्भ, साहित्या संबंधीच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
कसं हुकलं यशवंतराव चव्हाण यांचं पंतप्रधानपद ?
पिंपरी-चिंचवड : ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावर आज महाराष्ट्राचा पंतप्रधान का होऊ शकला नाही याबद्दलचा इतिहास उलगडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकट मुलाखत घेण्यात आली.
त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचं पंतप्रधानपद कसं हुकलं? याची कहाणी सांगितली..लालबहाद्दूर शास्त्रींच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाणांच पंतप्रधानपदाचे दावेदार होते. पण इंदिरा गांधींचं मत विचारायला गेलेल्या यशवंतरावांच्या बाबतीत इंदिरा गांधींनी गोड बोलून कसं पंतप्रधानपद मिळवलं.
याचा किस्सा पवारांनी या मंचावर उलगडून दाखवला.यशवंतरावांच्या शुचितेमुळे त्यांनी पंतप्रधानपद कसं गमावलं याचा इतिहासच पवारांनी उलगडून दाखवला.