सावधान! फेसबुकवरून केली जातेय बदनामी... महाविद्यालयीन मुलीची बदनामी झाल्याची धक्कादायक माहिती...
कोल्हापूर - येथील एका महाविद्यालयीन युवतीचे फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून त्यामध्ये अश्लील मजकूर आणि पोज लोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुढील तीन वर्षांत तुझे खानदान उद्ध्वस्थ करणार, अशी धमकी याच माध्यमाद्वारे देण्यात आली आहे. जालना, औरंगाबाद आणि कोल्हापूर ग्रुपमधील तरुणांत आता या फेसबुक ग्रुपची चर्चा रंगत आहे. फेक अकाऊंट आता सायबर गुन्हा ठरला असून त्याचा पोलिसांमार्फत गोपनीय तपास सुरू झाला आहे.
तू फेसबुकवर आहेस काय, असे सहज विचारले जाते. अकाऊंट (खाते) उघडून त्यावर स्वतःचे वेगवेगळ्या "पोज‘चे फोटो अपलोड (भरणा) केले जातात. काही वेळा मित्र-मैत्रिणींचे फोटोही अपलोड केले जातात. किती लाईक (प्रतिसाद) मिळाले, यावर आपली प्रसिद्धी रुबाबात मिरवितात. अशाच पद्धतीने येथील एका महाविद्यालयीन युवतीच्या नावाचे ओरिजिनल एफबी अकाऊंटवरील फोटो डाऊनलोड करून तिच्याच नावे तयार केलेले "फेक अकाऊंट‘ (बनावट खाते उघडणे) सध्या "एफबी‘वर धुमाकूळ घालत आहे. "मी कॉल गर्ल आहे‘, "तुम्ही माझ्याशी संपर्क साधा‘, यांसह इतर अश्लील मजकूर लिहिला आहे. त्या युवतीच्या ओरिजिनल एफबीच्या अकाऊंटवरील फोटो डाऊनलोड करून त्याचे अश्लील फोटोत रूपांतर केले आहे. तेही फेक अकाऊंटमध्ये लोड केले आहेत.
एफबीचे अकाऊंट आता ग्रुपमध्ये रूपांतरित झाले आहे. या ग्रुपमध्ये जालना, औरंगाबाद आणि कोल्हापूरमधील तरुण-तरुणींचा समावेश आहे. अनेकांनी फेक अकाऊंटवर मर्यादा ओलांडून कॉमेंटस् (प्रतिक्रिया) दिल्या आहेत. संबंधित युवतीचे फोटोही त्यावर अपलोड केले आहेत. त्यामुळे ही युवती सध्या तणावाखाली आहे. तिला किंवा तिच्या कुटुंबीयांना जे काय कायदेशीर करावयाचे आहे त्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. पोलिसांकडूनही त्याचा गोपनीय पद्धतीने तपास सुरू झाला आहे.
कोल्हापूरसह जालना, औरंगाबाद चर्चेत
एखाद्या ग्रुपवर असंसदीय (अश्लील) संभाषण किंवा फोटो व्हायरल (प्रसिद्ध) झाल्यास तो ग्रुप फार चर्चेत येतो. असाच काहीसा प्रतिसाद या फेक अकाऊंटला मिळाला आहे. त्यामुळे या अकाऊंटवरील ग्रुपमधील सदस्यांची संख्या तब्बल 548 हून अधिक झाली आहे. ही संख्या वाढत आहे. कोल्हापूरसह जालना आणि औरंगाबाद येथे याची चर्चा सुरू झाली आहे. या सायबर गुन्ह्याचा तपास जलद गतीने होऊन संबंधितांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.
बदनामी आणि धमकीसुद्धा...
संबंधित युवतीने स्वतःच्या ओरिजिनल एफबी अकाऊंटवरून फेक अकाऊंटवर संबंधिताशी चर्चा केली. तू कोण आहेस, का असे करतोस, अशी विचारणा केली. यावर उलट प्रतिसादात तीन वर्षांत तुझ्या खानदानाला संपवणार आहे. पुढे पुढे पाहा अशी धमकीही दिली आहे. त्यामुळे संबंधित युवतीने स्वतःच्या ओरिजिनल अकाऊंटवरून काही माहिती काढून टाकली आहे; मात्र फेक अकाऊंट आजही सुरूच आहे.