विठ्ठल साखर कारखाना निवडणुकीत 27033 पैकी 23926 सभासद मतदारांनी केले मतदान

पंढरपूर Live वृत्त
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी आज मतदान झाले. एकूण 27033 ऊत्पादक सभासदांपैकी 23926 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.  एकुण 88.51% मतदान झाले. संस्था गटातील 60 मतदारांनी राखीव 5 जागांसाठी मतदान केले. या गटातील जागा यापुर्वी बिनविरोध झाली आहे. मतदान शांततेने पार पडले. मतमोजणी मंगळवार दि. 19/1/2016 रोजी पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे.