भारतीय संविधान, राष्ट्रविकास अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे यांनी केला भारतीय संविधान या विषयावर सलग 16 तास 30 मिनिटे बोलण्याचा विक्रम

भारतीय संविधान, राष्ट्रविकास अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे यांनी केला   भारतीय संविधान या विषयावर सलग 16 तास 30 मिनिटे बोलण्याचा विक्रम 

 
भारतीय संविधान, राष्ट्रविकास अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान या विषयावर सलग 16 तास 30 मिनिटे बोलण्याचा विक्रम केला आहे.

दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 7.45 पासून 26 जानेवारी रोजी रात्री 12.30 पर्यंत डॉ. पगारे यांनी भारतीय संविधान हा विषय मांडला. मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन येथे झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजसेवक भाई वैद्य अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.

डॉ. पगारे यांनी भारतीय संविधान हा विषय मांडताना संविधानाचे विश्लेषण, त्याच्याशी संबंधीत माहिती, संविधान निर्मिती प्रक्रिया, संविधान समितीतील सदस्यांच्या भूमिका अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. संविधान परिचयाच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेता म्हणून काय अपेक्षा होती हे देखील डॉ. पगारे यांनी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की डॉ. आंबेडकरांनी आपल्या हयातीतच ही चेतावनी दिली होती की एखादा मोठा महापुरुष जन्मभर तुमच्यासाठी लढला तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करू नका. व्यक्ती पूजेपासून दूर रहा. तसेच संविधान समितीतील सर्व सदस्यांना एकत्र घेऊन काम करण्याबाबत व संविधानाचा अभ्यास करून त्याची रचना करण्यासाठी स्वातंत्र्य दिल्याबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद यांची डॉ. आंबेडकर यांनी मनापासून स्तुती केली होती, असेही डॉ. पगारे यांनी लक्षात आणून दिले. याशिवाय कोणतीही पक्ष व्यवस्था ही राष्ट्रापेक्षा मोठी होऊ नये अथवा असू नये; पक्षाचे महत्व राष्ट्रहितापेक्षा व लोकशाहीहून अधिक असू नये, असे ठाम मत डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केले होते. कोणत्याही गोष्टीला विरोध दर्शवताना तो संविधानीय पद्धतीनेच नोडविला पाहिजे; क्रांतिकारी पद्धतीने आंदोलने केल्यास राष्ट्र पारतंत्र्यात जाण्याची शक्यता असते, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली होती., असे डॉ. पगारे यांनी सांगितले. यानिमित्ताने डॉ. पगारे यांनी संविधान निर्मितीशी संबंधित काही किस्से देखील सांगितले.

सलग 16 तास भारतीय संविधान या विषयाची मांडणी करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ. पगारे पहिलेच व्यक्ती असून यानिमित्ताने ‘गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  
 *****     

​अधिक माहितीसाठी संपर्क: शैलेश तुर्वणकर- ७७७४०७९१३६ ​