पिण्याचे पाणी उकळून वापरावे नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन     

पिण्याचे पाणी उकळून वापरावे
नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन
        पंढरपूर दि.07:-‍  शहरातील नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून, वापरावे.   पंढरपूर बंधाऱ्यात आलेले पाणी बऱ्याच दिवसाचे असून त्यावर शेवाळाचे प्रमाण जास्त असल्याने पाण्यावर पिवळसर हिरवा रंग आला आहे.  त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून पिण्यासाठी वापरावे असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेने केले आहे.