श्रीक्षेत्र मांगी तुंगी तीर्थक्षेत्राच्या 40 कोटी रुपयाच्या विकास आराखड्यास मंजुरी- मुख्यमंत्री
| |
![]() | |
नागपूर : श्री भगवान ऋषभदेव यांच्या भव्य मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा व प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारी 2016 मध्ये श्रीक्षेत्र मांगीतुंगी (जि. नाशिक) येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या 40 कोटी रुपयांच्या मांगीतुंगी तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. श्रीक्षेत्र मांगीतुंगी तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखड्यासंदर्भात येथील विधानभवनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार दीपिका चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित होते. या विकास आराखड्यामध्ये अंतर्गत रस्ते, वीज पुरवठा, मूर्ती परिसरात पर्यटकांसाठी जिना/लिफ्टची सुविधा, सार्वजनिक शौचालय, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी आदी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. |