सासरच्यांचा राग मुलींवर काढला , 2 मुलींची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
(महाराष्ट्र लाईव्ह : अमिर मुलाणी)
सोलापूर : सासरच्या मंडळींशी झालेल्या भांडणाच्या रागातून एक महिलेने पोटच्या दोन मुलींची हत्या करून स्वत:आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे.
सोलापूरच्या बसवनगरमधील एका घरात दोन लहान मुलींचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती, तर त्या मुलाची आईही गंभीर जखमी अवस्थेत आढळली उपचारांसाठी तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले प्रथमदर्शनी हा प्रकार म्हणजे कोणीतरी त्याच्यांवर हल्ला केल्याचा वाटत होता. मात्र त्या महिलेनेचे आपल्या मुलींची हत्या करून स्वत:चे जीवन संपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला भारती हिच्या पतीचे दोन वर्षेपूर्वी निधन झाल्यानंतर ती दोन मुलींसह दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या बसवनगर गावात ती सासरी राहत होती दोन- चार दिवसांपूर्वी भारतीचे तिच्या सासूसोबत भांडण झाले आणि त्या रागातूनच भारताने मुलींना मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.