पंढरपूर मर्चन्ट बँकेच्या निवडणुक आखाड्यात ‘परिवर्तन पॅनल’ पंढरपूर मर्चंट बँकेच्या सभासदांपुढे भक्कम पर्याय-पॅनलप्रमुख

पंढरपूर लाईव्ह:-

येथील दि.पंढरपूर मर्चंटस् को-ऑप.बँक लि.पंढरपूरच्या पंचवार्षीक निवडणूक 2014-15 ते 2019-20 साठी होणार्‍या निवडणूकीत बँकेच्या आर्थिक प्रगतीसाठी, बँकेच्या चौफेर विकासाचे  ध्येय घेऊन  ‘परिवर्तन पॅनल’ च्या माध्यमातून बँकेच्यटरा सभासदांसमोर एक भक्कम पर्याय उभा करत असल्याची माहिती पॅनलप्रमुखांनी दिली. या पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपले मत देऊन विजयी करा असे आवाहन परिवर्तन पॅनलचे ही यावेळी करण्यात आले.  ही निवडणुक लढविण्यामागची आपली ध्येय-धोरणे आणि आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी येथील राधेश हॉटेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
 

यावेळी बोलताना सुभाषराव  भोसले म्हणाले की, बँकेची स्थापना 12 मे 1961 साली झाली असून 15 ऑगस्ट पासून बँकेच्या व्यवहारास सुरुवात झाली तर तब्बल 55 वर्षे चालु असणार्‍या या बँकची म्हणावी अशी प्रगती झालेली नाही.विद्यमान सत्ताधार्‍यांनी या बँकेची वाटचाल अतीशय संथ गतीने करीत बँकेचे व्यवस्थापन करण्यात त्यांना पुर्णपणे अपयश आले आहे. तसेच आत्तापर्यंत बँकेची अवस्था उर्जित होणे अपेक्षीत असताना तसे न होता बँक सत्ताधार्‍यांच्या त्याच-त्याच धोरणांमुळे त्याच परिस्थीतीत राहीली आहे. त्यामुळे या बँकेला उर्जित अवस्थेत आणायचे असेल तर परिवर्तन पॅनल शिवाय पर्याय नाही.

यावेळी पुढे बोलताना नंदकुमार डोंबे म्हणाले की, पंढरपूर मर्चन्ट बँकेच्या सद्यस्थित संचालकांच्या मनमानी कारभारावर सभासद नाराज आहेत. बँकेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करावयास हवे मात्र आजतागायत बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने एकही भरीव सामाजिक कायथ केलेले नाही. सभासदांपुढे आजतागायत पर्याय नव्हता. मात्र आम्ही आमच्या या पॅनलच्या माध्यमातून सर्व स्तरावरील व्यक्तींना उमेदवारी देवून सभासदांपुढे एक भक्कम पर्याय ठेवला आहे.

तसेच पुर्वीच्या संचालक मंडळाने व सत्ताधार्‍यांनी आपल्याच लोकांना कर्जे दिली आहेत. त्यापैकी बरीच कर्ज प्रकरणे गंगाजळीत टाकण्यात आली आहेत. मर्चंटस् बँकेत सर्व स्तरातील लोकांच्या ठेवी आहेत, तर व्यापार्‍यांची बँक म्हणून जूनी ओळख असणार्‍या या बँकेवर काही राजकीय लोकांनी डल्ला मारत या बँकेची विश्‍वासार्हता संपूष्टात आणण्याचे धोरण योजले असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना केला. विविध ठिकाणी आपल्या बँकेच्या शाखा सुरु करता येत असताना देखील सत्ताधार्‍यांनी तसे न करता ङ्गक्त पाच  शाखांवर समाधान मानत बँकेची अर्थिक प्रगती होण्यापासून वंचित ठेवले आहे.  चॅरीटी ङ्गंड मध्ये किती पैसा गोळा झाला व त्यातील किती पैसा सत्ताधार्‍यांनी खर्च केला हे सांगावे असा जाहिर सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
 

दरम्यान परिवर्तन पॅनलचे महिंद्र बाजारे, सुभाष भोसले, नंदकुमार डोंबे, निलराज डोंबे, शिवराज डोंबे, विश्‍वनाथ कावळे, विनायक माने, धनंजय मेणकुदळे, रामचंद्र सरवदे, आप्पासाहेब स्वामी, ज्ञानेश्‍वर चोरमले या उमेदवारांना बँकेच्या हितासाठी सभासदांनी आपले मत देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

आम्ही निवडून आल्सास या सुविधा सुरु करु...!

सर्व जाती धर्माच्या लोकांना गृह कर्ज सुरु करणार, सुशिक्षीत बेरोजगारांना कर्ज देण्याची सोय करणार, शिक्षण कर्ज, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना कर्जावर सुट देऊन त्यांना अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, लघु उद्योग कर्ज सुरु करणार, छोटे-मोठे हातगाडे वाले व ङ्गेरीवाले तसेच व्यापार्‍यांसाठी सुलभ कर्ज व्यवस्था करणार. तसेच ठेवीदारांना बँकेचे हित लक्षात घेता व ठेवीदारांचा तोटा न होता त्यांच्या दोहोंमध्ये समन्वय साधुन जास्तीत जास्त व्याज दर देण्याचा प्रयत्न करणार. समाजातील घटकांना सामाजिक बांधीलकी जोपासून समाजउपयोगी कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी पॅनलप्रमुखांनी दिली.

*




*********************


 

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  11हजार 822 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 31-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 11 हजार 812 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  29-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   11 हजार 822 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399