जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात सातत्य ठेवावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर,दि.25 (उ.मा.का.):-  जलयुक्त शिवार अभियानामध्ये सध्या होत असलेल्या कामांवरच न थांबता ही कामे आगामी दोन-चार वर्षे सातत्याने केल्यास आपण कायम पाणीयुक्त व दुष्काळमुक्त होऊ, असा  विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आज व्यक्त केला.







जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यलमर मंगेवाडी (ता.सांगोला) येथील सिमेंट नाला बंधारा, ओढा रुंदीकरण व खोलीकरण, पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, उर्जा मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, ‍जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर उपस्थित होते. 

लोकसहभागातुन प्रत्येक गावाला जलस्वयंपूर्ण करणे या आपल्या शासनाच्या उद्दीष्टाप्रमाणे विविध ‍ठिकाणी लोकांनी  कशी कामे केली ते पाहण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिशय चांगल्या प्रकारचे काम आपण करुन दाखवले. यामुळे नक्कीच या भागात परिवर्तन होणार असून  त्यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात. कोणतीही योजना केवळ सरकारच्या भरवशावर नाही, तर  समाजाच्या, जनतेच्या भरवशावर यशस्वी होऊ शकते, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार  अभियानामध्ये ज्या ठिकाणी लोकसहभाग,  ज्या क्षणी लोकांना असं वाटेल की आमच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. गावात पडणारा पावसाचा  प्रत्येक थेंब आमच्या मालकीचा आहे. त्यावेळी लोकसहभागातून घेतलेल्या कामामुळे निश्चीतच परिवर्तन होईल, जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्य शासन, लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी निश्चीतपणे उभे राहतील. निरा
कालव्याचे पाणी मंगेवाडी पाझर तलावामध्ये सोडण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी तपासून याबाबत आवश्यक  ती कार्यवाही त्वरीत करण्याचे निर्देश सबंधीतांना तात्काळ देण्यात येतील, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती ‍दिली. ग्रामस्थांनी लोकसहभागातुन पाझर तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात भरुन नेल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता 0.10 द.ल.घ.मी. वरुन 4.8 द.ल.घ.मी. इतकी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे ते म्हणाले. तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे आदींसह पदाधिकारी, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                              *****

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार 821 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 259 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 821 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399