पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
छत्तीसगड दौ-याच्यावेळी डोळयात गॉगल घालून मोदींचे स्वागत करणा-या
जिल्हाधिका-याला छत्तीसगड सरकारने नोटीस बजावली आहे.
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
रायपूर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौ-याच्यावेळी डोळयात गॉगल घालून
मोदींचे स्वागत करणा-या जिल्हाधिका-याला छत्तीसगड सरकारने नोटीस बजावली
आहे. अमित कटारिया असे या अधिका-याचे नाव असून ते बस्तरचे जिल्हाधिकारी
आहेत.
नरेंद्र मोदी नऊ मे रोजी छत्तीसगड दौ-यावर
होते. जगदालपूर विमानतळावर मोदींचे स्वागत करताना
कटारिया यांनी डोळयांना
गॉगल लावला होता. राज्य सरकारच्या मते अमित कटारिया यांची ही कृती नियमांचे
उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांनी कटारिया यांना इशारा देणारी नोटीस बजावली
आहे.
कटारिया यांनी डोळयांना
गॉगल लावला होता. राज्य सरकारच्या मते अमित कटारिया यांची ही कृती नियमांचे
उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांनी कटारिया यांना इशारा देणारी नोटीस बजावली
आहे.
बस्तरचे जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही नऊ मे
रोजी जगदालपूर विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी तुम्ही
डोळयांना लावलेला गॉगल आणि परिधान केलेले कपडे योग्य नव्हते असे या
नोटीसमध्ये म्हटले आहे.

भारतीय सेवा (वर्तणूक) नियम कलम ३
(१) चे उल्लंघन केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. भविष्यात पुन्हा अखिल
भारतीय सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्या असे
कटारिया यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
कोण आहेत कटारिया
मूळचे हरियाणाचे असलेले अमित कटारिया हे २००४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. कारकीर्दीत आतापर्यंत त्यांना जिथे जिथे काम करण्याची संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या ते बस्तरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.