पंढरपूर लाईव्ह- :
कुर्डूवाडी -ग्रामीण भागातील विद्यार्थी आता इंटरनेट युगात खूप हुशार झाले असून त्यांना आता तंत्र शिक्षणाची नव्याने ओळख करून देण्याची गरज असून हा विडा पंढरपूरच्या विठ्ठल श्री इंजिनिअरींगने उचलावा. या तंत्रशिक्षणाच्या माहिती मुळे विध्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला असून असा उपक्रम विशेषतः ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत राबवावेत.’असे प्रतिपादन येथील मध्य रेल्वे प्रशालेचे प्राचार्य डॉ. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित
इंजिनिअरींग कॉलेज तर्फे येथील न.पा.प्रा.शिक्षण मंडळाच्या विनायक सभागृहात
आयोजिलेल्या तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात प्राचार्य डॉ.रमेशकुमार मत
मांडत होते.प्रारंभी प्रा. यशपाल खेडकर यांनी या मेळाव्याचा हेतू स्पष्ट
करून ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता पात्र असूनही केवळ
योग्य माहितीव मार्गदर्शना अभावी त्यांना आपल्या गुणवत्तेचे महत्व समजत
नाही.या करिताच या मेळाव्याचे आयोजन केले होते. संशोधन विभागाचे अधिष्ठाता
डॉ. प्रशांत पवार यांनी स्वेरीची थोडक्यात ओळख करून देवून तंत्रशिक्षणाच्या
वाटा याबद्दल माहिती देवून संशोधनातील प्रगतीवर प्रकाश टाकून ग्रामीण
विद्यार्थ्यांमुळेच मोठी मजल मारता आल्याचे सांगितले. प्रा.मंगल खांडेकर
यांनी फार्मसीच्या माहिती मधून वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध माहिती सादर
केली. प्रशासन अधिष्ठाता डॉ. एस.एम. मुकणे यांनी कष्टाशियाय पर्याय नसून
तंत्रशिक्षण घेताना कसे परिश्रम करावे हे सांगून आता प्रत्येक क्षेत्रात
अभियंत्यांची निवड होताना दिसत आहे. यासाठी प्रत्तेक विध्यार्थ्यांनी
तंत्रज्ञानाची माहिती जाणून घ्यावी असे सांगितले. पुढे बोलताना प्राचार्य
रमेशकुमार म्हणाले,आमचे काही विद्यार्थी आपल्याच महाविद्यालयातून शिक्षण
घेऊन पुण्यात स्थायिक झालेत.ते कुर्डुवाडीत परतल्यावर मला भेटतात आणि यश
कसे मिळाले याचे गमक उलघडून दाखविताना या शिस्त व आदरयुक्त संस्कारामुळेच
श्री विठ्ठल इंजिनिअरींगने शिक्षण क्षेत्रात गरुडझेप मारल्याचे दिसून
येते.हेच तंत्र विद्यार्थ्यांना भविष्यकाळात निश्चित लाभदायी ठरणार
आहे.त्याच बरोबर तेथे अभियंत्यांबरोबरच संशोधक देखील तयार होत असल्याचे
दिसून येत आहे.’ या मेळाव्यात मुलांपेक्षा मुलींचा सहभाग अधिक
होता.कार्यक्रमानंतर रुपाली खुने,स्वप्नाली कुबेर,रोहन सोनवणे, ओंकार
सुतार,आकाश शेंडगे,फिलीप काळे व अनेकांनी संबंधित प्राध्यापकांना भेटून
प्रवेशाबाबतीत व तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती जाणून घेतली.यामध्ये
प्रवेशापासून ते गरीब होतकरू विध्यार्थ्यांना कमवा व शिका
योजना,वसतिगृहातील सुविधा,1024 एम.बी.पी.एस. इंटरनेटची वायफाय लीज लाईन, 24
तास विद्यूत पुरवठा,आर.ओ.युक्त पिण्याचे पाणी,कॅम्पस प्लेसमेंट या व अशा
अनेक सोयसुविधांची माहिती दिली.यावेळी सोबत ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंटचे डॉ.
माधव राऊळ, प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ. सतिश लेडवे,डॉ.रघुनाथ
हरिदास,प्रा.माधुरी पालकर,प्रा.एस.डी.भोसले ,प्रा.शिरसट,संतोष हलकुडे
यांच्यासह घाटने, कव्हे, रोपळे, चिंकहील, पिंपळनेर, भुताष्ठे, कुर्डू, लऊळ व
कुर्डूवाडीसह आसपासच्या गावातील जवळपास 450 विध्यार्थी व पालक उपस्थित
होते.छायाचित्र-1.व 2.येथील विनायक सभाग्रहात आयोजिलेल्या तंत्रशिक्षण मेळाव्यात मत मांडताना प्राचार्य डॉ.रमेशकुमार सोबत डावीकडून प्रा.एस.डी.भोसले,प्रा. यशपाल खेडकर, प्रा.माधुरी पालकर, प्रा.मंगल खांडेकर, डॉ.एस.एम. मुकणे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. सतिश लेडवे आदी.
3.इंजिनिअरींग व फार्मसी प्रवेश संदर्भातील माहिती जिज्ञासापुर्वक विचारल्यानंतर प्रा मंगल खांडेकर व प्रा माधुरी पालकर यांच्या समवेत काही विध्यार्थीनींनी दिलेली एक भावमुद्रा.
From-
Shri. Santosh C. Halkude
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .






