पंढरपूर लाईव्ह
सोलापूर दि. 21 – आपल्या विचारांनी संपूर्ण जगात लोकशाही मुल्यांचे
बीजारोपण करणा-या महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढा येथे स्मारक उभारण्यात
येणार आहे. या स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत
लवकरच बैठक बोलावून, जागेबाबतचा प्रश्न तातडीने निकाली काढू अशी ग्वाही
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बसवेश्वर जयंतीनिमित्त, कौंतम चौक येथे उभारण्यात आलेल्या महात्मा
बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर झालेल्या छोटेखानी
सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री
विजय ना. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बसवेश्वरांनी संपूर्ण जगाला
शांततेची, समतेची शिकवण दिली आहे. तिच शिकवण आपण अनुसरुन या राज्याचा कारभार करु तसेच राज्याचा चांगला कारभार करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला बळ द्यावे अशी प्रार्थनाही त्यांनी केली. तत्पूर्वी पालकमंत्री ना. विजय देशमुख यांनी, सोलापूर जिल्ह्याला भेडसावणा-या विविध समस्यांचा आढावा घेताना मुख्यमंत्री महोदयांनी अक्कलकोट रोड येथे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी मदत करावी, विडी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण
करण्यासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली.




