पंढरपूर लाईव्ह:-



दि. 24 एप्रिल 2015 रोजी मुख्याधिकरी
श्री. शंकर गोरे यांनी विषय समिती व स्थायी समिती सदस्य व विषय सभापती
नामानिर्देशन पत्रे स्विकारली. ठिक 3 वाजता विविध विभागाच्या विषय समिती व
स्थायी समिती व स्थायी समिती सभापतीच्या नामनिर्देशन पत्राची छाननी, परत
घेणे व नामनिदेशरन पत्राचे प्रकटन करणे व विषय समिती सभापती निवडणुक निकाल व
स्थायी समितीची रचना इ. बाबत उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी संजय
तेली यांनी जाहिर करुन सभेचे कामकाज पुर्ण केले.
खालील
सभापतींची निवड करण्यात आली. बांधकाम समिती सभापती शाम वसंत नेहतराव,
आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीसौ. मनिषा धनंजय कोताळकर, शिक्षण समिती
सभापती शैलेश लक्ष्मण बडवे, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती सुनिल
भाऊसाहेब डोंबे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ.वैष्णवी विवेक
बेणारे, नियोजन व विकास समिती सभापती (रिक्त) तसेच स्थायी समिती सदस्य पदी
दगडू नारायण धोत्रे, संजय दशरथ घोडके, सरुबाई महादेव ढोले यांची निवड
करण्यात आली. असल्याचे पिठासीन अधिकारी संजय तेली यांनी घोषीत केले. यावेळी नुतन पदाधिकार्यांचा सत्कार संजय तेली यांच्या हस्ते करण्यात आला.
**************




